‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचं नाव चाहत्यांच्या तोंडी येतंच. अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं. आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना तिला कुटुंबियांची उत्तम साथ मिळाली. याबाबत तिने एका इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये भाष्य केलं होतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच ती आता मराठी चित्रपटांसाठीही काम करते. पण आपल्या कामामधून वेळात वेळ काढत ती कुटुंबासाठीही तितकाच वेळ देते. नम्रता मुलगा रुद्राजचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही रुद्राजचा एक क्युट व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – आर्थिक संकट ओढवल्यानंतर शरद पोंक्षेंनी डोंबिवलीत सुरू केला नवा व्यवसाय; त्यांनीच सांगितला किस्सा!

a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ

नम्रता रुद्राजचे बरेच व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करते. तिच्या लेकाच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. या नव्या व्हिडीओमध्ये रुद्राज “एकटी एकटी घाबरलीस ना…” हे सुंदर मराठी गाणं गाताना दिसत आहे. आपला लेक गाणं गात आहे हे पाहून नम्रतालाही अश्रू अनावर होतात. व्हिडीओ शेअर करताना तिने भावुक संदेशही लिहिला आहे.

पाहा व्हिडीओ

“हे गाणं जेव्हा म्हणते तेव्हा अक्षरशः कंठ दाटून येतो उर भरून येतो… आणि मग माझं इवलंसं लेकरू माझा रुद्राज म्हणतो आई तू नको रडूस मी आहे ना…” असं नम्रताने म्हटलं आहे. लेकाचं गाणं ऐकून नम्रताला अगदी अश्रू अनावर होतात. नम्रताच्या लेकाच्या या गोंडस मुलाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – ‘कंतारा’ भारतातील नंबर वन चित्रपट! ‘KGF 2’, ‘RRR’ पेक्षाही ठरला सरस

गोंडस, तुझीच कॉपी आहे, रुद्राज खूपच छान असा अनेक कमेंट व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडीओला एका तासामध्येच दोन हजारापेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. खरंच आई विषयीचं गाणं म्हणताना रुद्राज या व्हिडीओमध्ये अधिक क्युट दिसत आहे.