‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात २ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह विवाहबंधनात अडकली. वनिताच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताच्या लग्नातील कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. कलाकार मंडळींनी वनिताच्या लग्नामध्ये अगदी धमाल मस्ती केली. आता या लग्नामध्ये हजेरी लावलेल्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने व स्नेहल शिदम रिलेशनशिपमध्ये? शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
love became mistake chatura
आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने पती अनिरुद्ध शिंदेबरोबर वनिताच्या लग्नाला हजेरी लावली होती. यादरम्यानचा फोटो अनिरुद्धने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. याचं कारणही तितकंच खास आहे. रसिका व अनिरुद्धचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. याचनिमित्त रसिकाच्या पतीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

अनिरुद्धने म्हटलं की, “तुझ्यासारखी बायको मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. तू मला प्रत्येकवेळी मार्गदर्शन तसेच पाठिंबा देते ते फारच वेगळं आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माऊ”. अनिरुद्धने रसिकावर असणारं प्रेम अगदी खुलेपणाने व्यक्त केलं आहे. तसेच या दोघांवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – राखी सावंतने नवऱ्यावर केलेल्या आरोपांबाबत आदिल खानच्या वकिलांचा मोठा खुलासा, म्हणाले, “प्लॅन करुन…”

अनिरुद्धने शेअर केलेला फोटोही तितकाच खास आहे. तो रसिकाला किस करताना दिसत आहे. अनिरुद्धही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तो एक दिग्दर्शक आहे. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर’ मालिकेचं दिग्दर्शन अनिरुद्धने केलं होतं. या मालिकेमध्ये रसिकाही महत्त्वाच्या भूमिकेमध्ये होती.

Story img Loader