‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेल्या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे वनिता खरात. या कार्यक्रमामध्ये वनिता साकारत असलेल्या भूमिकांचं सर्वत्र तोंडभरुन कौतुक होताना दिसतं. वनिताच्या चाहतावर्गामध्ये तर आता प्रचंड वाढ झाली आहे. इतकंच नव्हे तर ती सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांशी अधिकाधिक संवाद साधते. कामाविषयी असो वा खासगी आयुष्य ती नेहमीच सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक मिळाल्यानंतर वनिता तिचा पती सुमित लोंढेसह गोव्याला पोहोचली होती. तिथे धमाल-मस्ती करतानाचे बरेच फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते. वनिताबरोबरच तिचा पती सुमितही आता चर्चेत असतो. चक्क इन्स्टाग्रामने वनिताच्या पतीची दखल घेतली आहे.
आणखी वाचा – लेह-लडाखला पोहोचले समीर चौघुले, फोटो पाहून प्राजक्ता माळीची कमेंट, म्हणाली, “दादा…”
सुमितच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला आता ब्ल्यु मार्क मिळाला आहे. म्हणजेच त्याचं अकाऊंट आता अधिकृत झालं आहे. याबाबत वनिताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच सुमितचं अकाऊंट अधिकृत झालं असल्याचं तिने या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. शिवाय सुमितलाही याचा आनंद झाला आहे. त्यानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्टोरी पोस्ट करत आनंद व्यक्त केला.
आणखी वाचा – “देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण…” सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा, म्हणालेली, “आम्ही अजूनही…”
वनिताने सुमितबरोबरचा गोव्यामधील फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये दोघं स्विमिंगपुलमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहेत. वनिता म्हणाली, “सुमा ब्ल्यु मार्कसाठी अभिनंदन”. वनिताच्या या पोस्टवर सुमितने कमेंट केली आहे. तो म्हणाला, “खूप प्रेम. याचं सगळं श्रेय फक्त तुला जातं”. तसेच नम्रता संभेरावनेही सुमितचं अभिनंदन केलं.