सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेक्षक अगदी भरभरुन प्रेम करतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे कार्यक्रमामधील काही विनोदवीरांचं तर नशिबच बदललं. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे दत्ता मोरे म्हणजेच सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे.

दत्तू या कार्यक्रमामध्ये साकारत असलेली भूमिका अगदी हटके आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारी असते. दत्तूचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. तो ठाण्यामधील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत राहतो. दत्तू राहत असलेल्या चाळीला ‘दत्तू चाळ’ असं नाव देण्यात आलं. तीन बहिणी व आई-वडील असा दत्तूचा परिवार आहे. या सगळ्यांचा सांभाळ दत्तू करतो. शिवाय आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना घरात बसून छोटं मोठं कामंही या भावंडांनी केलं. ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत दत्तू व त्याच्या बहिणींनी याबाबत भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”

आणखी वाचा – “आता माझे वडील नाहीत पण…” आकाश ठोसरने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या आईने…”

दत्तू मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. याचबाबत त्याने ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. दत्तू म्हणाला, “शाळेत असतानाच मला नृत्य, नाटकाची आवड होती. महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर कलाक्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर काय करावं हे मला तेव्हा कळलं नाही. दरम्यान मी एकांकीकासाठी बॅक स्टेज काम करु लागलो. बॅक स्टेज आर्ट्ससाठी काम करत असताना एकांकीकेमध्ये छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. तिथून माझा हा अभिनयाचा प्रवास सुरू झाला”.

आणखी वाचा – Video : नीता अंबानींच्या कार्यक्रमात नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडला पाहून ऐश्वर्या रायने केलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

“पण त्यानंतरही मध्यंतरी असा एक काळ होता जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू लागलो. हिंदी तसेच मराठी मालिकांसाठी जवळपास चार वर्षे मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. यादरम्यानच मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमासाठी काम करायला सुरुवात केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रॉडक्शनमध्ये मी काम करत होतो. प्रॉडक्शनमध्ये काम करत असताना मला एका स्किटमध्ये छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली”. दत्तूचा हा संपूर्ण प्रवास खरंच कौतुकास्पद आहे.