‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकारांची नेहमीच चर्चा रंगताना दिसते. कार्यक्रमातील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. दत्तूने आजवर या कार्यक्रमात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता दत्तून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दत्तू विवाहबंधनात अडकला आहे. त्याचे पत्नीबरोबरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं. त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूच्या प्री-वेडिंगचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्याच्या या फोटोंवर रसिका वेंगुर्लेकर, पृथ्विक प्रताप आदी कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. तसेच शिवालीने दत्तूचा प्री-वेडिंगचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा – “परवा रात्री माझ्यावर चार गुंडांनी हल्ला केला आणि…” संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मी त्यांच्याशी…”

शिवाली म्हणाली, “दत्तू आणि आमच्या वहिनी दोघांसाठीही मी खूप खुश आहे. खूप खूप अभिनंदन दत्तू”. शिवालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये दत्तू व त्याची पत्नी स्वाती एकमेकांकडे बघताना दिसत आहे. दत्तूच्या प्री-वेडिंगचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र त्याचे लग्नाचे फोटो अजूनही समोर आलेले नाही.

आणखी वाचा – “घराचं भाडं द्यायला गेले अन् त्या नगरसेवकाने मला…” तेजस्विनी पंडितबरोबर घडला होता विचित्र प्रकार, म्हणालेली, “मी त्याक्षणी…”

‘फ्रेम फायर स्टुडिओ’ने शेअर केलेल्या दत्तूच्या प्री-वेडिंगच्या फोटोंना “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन दिलं आहे. दत्तूच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे आहे. मंगळवारी(२३ मे) दत्तूने स्वाती घुनागे हिच्यासह गुपचूप लग्न उरकलं. सध्या सगळीकडेच दत्तूच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem dattu more tie knot with swati shivali parab share actor pre wedding photos see details kmd