‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरे प्रकाशझोतात आला. तो या कार्यक्रमापुरतीच मर्यादीत राहिला नाही. आता मराठी चित्रपटांमध्येही गौरव काम करताना दिसत आहे. ‘हवाहवाई’ या मराठी चित्रपटामध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी त्याने भरत जाधव यांच्यासह एका नव्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. दरम्यान गौरवच्या अभिनयासह त्याच्या हेअर स्टाइलची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते.

आणखी वाचा – Video : ऑस्ट्रेलियामध्ये कराडच्या मराठमोळ्या तरुणाचा व्यवसाय पाहून भारावले प्रवीण तरडे, म्हणाले, “७० हजार किलोचा माल…”

Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरवर साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात तो कायमच यशस्वी ठरतो. त्याची हेअरस्टाइल तर विशेष लक्षवेधी असते. लांब केस तो जेव्हा मान डोलवत हवेत उडवतो ते प्रेक्षकांना विशेष आवडतं. त्याची हेअरस्टाइलच त्याच्या प्रत्येक पात्राची खासियत असते.

“आय एम गौरवर मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” हे वाक्य गौरवच्या तोंडून ऐकायचा अधिक गंमतीशीर वाटतं. त्याच्या स्किटची सुरुवातच या वाक्याने होते. हे वाक्य बोलून झाल्यानंतर तो आपले केस हवेत उडवताना दिसतो. आता त्याने त्याची हेअरस्टाइल बदलली आहे. त्याने यादरम्यानचा फोटोही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर प्रियदर्शनीने सोडंल मौन, म्हणाली, “मैत्री वाढली आणि…”

नव्या हेअरस्टाइलचा फोटो शेअर करत गौरव म्हणाला, “माझी नवी हेअरस्टाइल”. या फोटोमध्ये गौरवने बाजूचे वाढलेले केस थोडे कापलेले दिसत आहेत. तर केसांचा मधला भाग उंच केलेला दिसत आहे. गौरवचा हा लूक अगदी हटके वाटत आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील पुढील भागांमध्येही त्याची हेअरस्टाइल बदलणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

Story img Loader