सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. आता हा कार्यक्रम सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. या कार्यक्रमामधील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. चाहत्यांच्या प्रेमापोटी पहिल्यांदाच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी परदेश दौरा केला. यावेळी दुबईमधील प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी खळखळून हसवलं.

आणखी वाचा – Video : “मी कोणाचं खात नाही अन् कोणाच्या बापाला…” किरण मानेंनी शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Marathi actress Prajakta Mali visit maha kumbh mela 2025 in prayagraj
Video: प्राजक्ता माळीने महाकुंभ मेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, अनुभव सांगत म्हणाली, “लहानपणापासूनच…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
vicky kaushal
Video: विकी कौशलने पाटणामध्ये घेतला लिट्टी-चोखाचा आस्वाद; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
Anusha Dandekar at Priyanka Chopra brother Siddharth sangeet watch video
Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला मराठी अभिनेत्रीची हजेरी, ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा
Priyanka Chopra adorable gesture for bhabhi video viral
Video: नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
Janhvi Kapoor
‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूरने पोस्ट केले खुशीबरोबरचे सुंदर फोटो

नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले यांसारख्या कलाकारांना दुबईकारांनी भरभरुन प्रेम दिलं. यादरम्यानचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेत या कलाकारांनी दुबईमध्ये बरीच धमाल-मस्ती केली. शिवाय गौरव, नम्रता, प्रसाद एकत्र शॉपिंगला गेले.

गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दुबईमधीलच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौरव त्याच्या सहकलाकारांबरोबर परफ्युम खरेदी करताना दिसत आहे. तसंच दुबईमधील ज्या दुकानामध्ये या कलाकारांनी शॉपिंग केली हे दुकान त्यांच्या ओळखीचं आहे. गौरवने या दुकानाची माहितीही व्हिडीओद्वारे दिली.

आणखी वाचा – Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”

दुबईमध्ये गौरव जेव्हा स्किट सादर करण्यासाठी मंचावर आला तेव्हा प्रेक्षकांनी गौरव गौरव असा जल्लोष केला. प्रेक्षकांचं मिळत असलेलं प्रेम पाहून तो अगदी भारावून गेला. गौरवरने यादरम्यानचा व्हिडीओही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. तसेच गौरवने प्रेक्षकांचे आभारही मानले.

Story img Loader