‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरेला एक वेगळीच ओळख मिळाली. तो आता मराठी चित्रपटांसह जाहिरातींमध्येही काम करत आहे. गौरव आपल्या करिअरमध्ये एक एक पाऊल पुढे टाकत आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा विनोदी कलाकार आता चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा- ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना लग्न करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, “१३ वेळा माझं लग्न झाल्यानंतर..”

‘माझीया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेतून गौरवने मनोरंजनसृष्टीत पदापर्ण केलं होतं. पण खऱ्या अर्थाने त्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे लोकप्रियता मिळाली. गौरवने याआधी हवाहवाई चित्रपटात काम केलं होतं. आता गौरव नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुश असं या चित्रपटाचं नाव आहे. ६ ऑक्टोबर २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- “तू फिल्म इंडस्ट्री सोडली आहेस का?” न्यूझीलंडला गेलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं चाहत्याला स्पष्ट उत्तर, म्हणाली…

राजाभाऊ अप्पाराव घुले यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अंकुश या चित्रपटातील गौरव मोरेचा लूक नुकताच समोर आला होता. या चित्रपटात गौरव मंग्या दादाची भूमिका साकारणार आहे. आत्तापर्यंत गौरवने छोटा पडदा गाजवला होता. मात्र आता चित्रपटाच्या माध्यमातून गौरव मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसणार आहे. अंकुश या चित्रपटात गौरव बरोबर अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उद्घीरकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या नायकाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.