‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता अगदी प्रत्येकाला खळखळून हसवतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे निखिल घराघरांत पोहोचला. आज त्याचे हजारो चाहते आहेत. पण खऱ्या आयुष्यामध्ये तो अगदी साधा आणि उत्तम व्यक्तीमत्त्व असलेला कलाकार आहे. निखिल भांडूपमधील एका चाळीमध्ये राहतो. चाळीमधील अनेक व्हिडीओ तो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.

चाळ संस्कृतीमध्ये राहत असल्याचा निखिलला अभिमान आहे. तो चाळीतील अनेक गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपण्याच्या प्रयत्नात असतो. आताही त्याने चाळीतील शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोहर चाळीतीच त्याचे काही मित्र दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा – सई ताम्हणकर बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर फिरतेय स्पेन; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित

पावसाळ्याची चाहुल लागताच चाळीमधील लोक घरावरील पत्र्यावर ताडपत्री टाकायचं काम सुरु करतात. कित्येक चाळीत राहणाऱ्या लोकांसाठी ही अगदी सामान्य गोष्ट आहे. निखिलसाठीही ही गोष्ट काही नवी नाही. यावर्षीही निखिलने मित्रांच्या सहाय्याने त्याच्या घराच्या पत्र्यावर ताडपत्री टाकली आणि यादरम्यानचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.

आणखी वाचा – Video : भांडूपच्या चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

निखिलच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. स्पृहा जोशी, पल्लवी पाटील, ऋतुजा बागवे यांसारख्या कलाकारांनी निखिलच्या या व्हिडीओवर कमेंट केली. तर एका चाहत्याने म्हटलं की, “भाई टेन्शन नको घेऊ. तुझीही वेळ येईल. एक दिवस हेच मित्र तुझ्या घराच्या टेरेसवर पार्टी करत असतील”. चाहत्याच्या या कमेंट वर निखिलने हार्ट इमोजी शेअर करत रिप्लाय केला.

Story img Loader