‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सप्तपदी घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. माझं लग्न हे लग्न नसून मोठा उत्सव होता असं वनिताने एका मुलाखतीदरम्यानही म्हटलं होतं. असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे तिच्या या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. खासकरून लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची बरीच मंडळी उपस्थित होती.
आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…
दरम्यान वनिता-सुमितच्या लग्नाला ओंकार भोजने उपस्थित नसल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या. ओंकारला लग्नाला बोलावलं की नाही? तो लग्नाला का नाही आला? वनिता खरात व त्याच्यामध्ये काही वाद आहे का? अशा विविध चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. आता ओंकार थेट वनिताच्या घरी पोहोचला आहे.
वनिता-सुमिताच्या लग्नाला येता आलं नाही म्हणून ओंकारने तिच्या घरी जात दोघांनाही खास सरप्राईज दिलं. तसेच या दोघांसाठी तो गिफ्टही घेऊन आला. वनिताला पाहताच ओंकारने तिला मिठी मारली. इतक्यात सुमित घरी येतो. आणि ओंकारच्या डोक्यात मारतो. ओंकारला मजेशीर अंदाजामध्ये तो समज देतो.
पाहा व्हिडीओ
सुमित म्हणतो, “हे सगळं स्किटमध्ये आता ती माझी बायको आहे”. वनिताचा हा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत. चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये वनिताच्या घराची झलकही पाहायला मिळत आहे. वनिता आणि ओंकारच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.