‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. शिवाय कार्यक्रमामधील अनेक कलाकार त्यांच्या विनोदी शैलीमुळे प्रकाश झोतात आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे सध्या सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात ते यशस्वी ठरले. पण त्याचबरोबरीने सोशल मीडियाद्वारेही विविध पोस्ट शेअर करत ते चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यंतरी प्रभाकर यांनी त्यांच्या पत्नीबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांचीही अधिकाधिक पसंती मिळाली. इतकंच नव्हे तर प्रभाकर आपल्या खासगी आयुष्याबाबतही सोशल मीडियाद्वारे माहिती देताना दिसतात.

आणखी वाचा – “तर मी माझ्या मुलीसाठी देशही सोडणार आणि…” लेक मालतीबाबत बोलताना प्रियांका चोप्राने केलेलं वक्तव्य चर्चेत

आताही त्यांनी त्यांच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत असताना त्यांनी आईसाठी खास संदेश लिहिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केलेल्या या फोटोमधून प्रभाकर यांचं त्यांच्या आईवर किती प्रेम आहे हे दिसून आलं. त्यांनी आईसाठी लिहिलेली पोस्ट अगदी लक्ष वेधून घेणारी आहे.

आणखी वाचा – Video : रितेश देशमुखला लागलं बायकोचं वेड, तोंडभरुन कौतुकही केलं, नवऱ्याचं प्रेम पाहून जिनिलिया म्हणते…

प्रभाकर मोरे म्हणाले, “आईसाठी दिवस नसतो तर आयुष्याचा प्रत्येक दिवसच आईमुळे असतो”. प्रभाकर हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.