‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. शिवाय कार्यक्रमामधील कलाकारांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात कोकणी भाषेमध्ये प्रभाकर आपली कला सादर करतात. त्याला प्रेक्षकही भरभरुन दाद देतात. शिवाय प्रभाकर सोशल मीडियावरही फारच सक्रिय आहेत.
सोशल मीडियाद्वारे आपल्या कुटुंबियांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करताना ते दिसतात. आपल्या या लाडक्या कलाकाराबाबत जाणून घेण्यास चाहत्यांना फार आवडतं. प्रभाकर त्यांच्या कामाबरोबरच कुटुंबालाही अधिकाधिक वेळ देताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच प्रभाकर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.
यानिमित्त त्यांनी आपल्या पत्नीसह एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. तसेच पत्नीवर असणारं प्रेम व्यक्त केलं. त्याचबरोबरीने प्रभाकर यांनी पत्नीबरोबरचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते पत्नीबरोबर समुद्रकिनारी फेरफटरा मारताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओ चाहत्यांचीही अधिकाधिक पसंती मिळाली आहे.
या व्हिडीओमध्ये प्रभाकर यांनी त्यांच्या पत्नीचा हात हातात घेतला आहे. शिवाय दोघांमध्ये प्रेमळ संवाद रंगला असल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून विविध कमेंट केल्या आहेत. कातील मोरे, मोरेंची शालू, सुपरहिट जोडी अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.