‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. शिवाय कार्यक्रमामधील अनेक कलाकार त्यांच्या कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने काही दिवसांसाठी छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. कार्यक्रमामधून मिळालेल्या वेळेमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार त्यांचा स्वतःचा वेळ एण्जॉय करत आहेत. प्रभाकर मोरे यांनीही या दरम्यान एक नवी घोषणा केली आहे.

प्रभाकर मोरे यांच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रभाकर यांनी आतापर्यंत उत्तमोत्तम पात्र साकारली. स्त्री वेशातही त्यांनी स्किट करत प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं. कोकणी शैलीत विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. त्यांचं ‘शालू’ हे गाणं तर विशेष गाजतं.

आणखी वाचा – धमाल-मस्ती, हॉट लूक, अन्…; बॉयफ्रेंडसह सई ताम्हणकरचं स्पेनमध्ये जोरदार बर्थडे सेलिब्रेशन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आता प्रभाकर यांनी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरु केलं आहे. इन्स्टाग्रामद्वारे व्हिडीओ शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली. ‘प्रभाकर मोरे टॉकिज’ नावाने त्यांनी हे युट्युब चॅनल सुरु केलं आहे. या युट्युब चॅनलद्वारे वेबसीरिज, विनोदी व्हिडीओ प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. प्रभाकर यांचं चाहते या नव्या प्रवासाबाबत अभिनंदन करत आहेत.

आणखी वाचा – “तेव्हा आईला त्रास व्हायचा आणि…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचं वडिलांबाबत भाष्य, म्हणाला, “खूप कमी वेळ…”

प्रभाकर यांनी खास व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नमस्कार मंडळी तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतं आहे की मी प्रभाकर मोरे माझं नवीन युट्युब चॅनेल आलं आहे. ज्यावर आपल्याला माझ्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट फिल्म व वेब सीरिजच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद”. प्रभाकर यांच्या नव्या वेबसीरिजची प्रेक्षक वाट पाहत आहेत.