सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधील कलाकारांची भलतीच क्रेझ आहे. या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. समीर चौघुले, नम्रता संभेराव, समीर चौघुले, वनिता खरात यांसारख्या कलाकारांचा तर चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यातील दोन कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर व चेतना भट. या दोघांनीही त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
आणखी वाचा – इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना खान ३४व्या वर्षी होणार आई, म्हणाली, “लवकरच…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चित्रीकरणादरम्यान कार्यक्रमामध्ये काम करणारी सगळीच मंडळी अगदी धमाल करतात. पडद्यामागे नेमकं काय घडतं? याबाबत अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी चित्रीकरणामधून मिळालेल्या वेळेमध्ये धमाल-मस्ती करताना दिसतात. आताही त्यांनी कार्यक्रमाच्या सेटवरच पडद्यामागे ‘अजीब दास्ताँ है ये’ हे गाणं गायलं. या गाण्यावर प्रसाद व चेतनाने रोमँटिक डान्स केला. चेतनाने हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
चेतना हा व्हिडीओ शेअर करताना म्हणाली, “जेव्हा सचिन गोस्वामी सर स्किटदरम्यान गाणं गातात. सुंदर आवाजामध्ये गायलेल्या या गाण्यावर डान्स करणं तुम्ही टाळू शकत नाही”. प्रसाद व चेतनाच्या डान्सपेक्षा सचिन गोस्वामी यांनी गायलेल्या गाण्याची सर्वाधिक चर्चा रंगत आहेत. नेटकरीही त्यांच्या आवाजाचं कौतुक करत आहेत. तसेच नम्रता संभेरावनेही कमेंट करत सरांनी छानच गाणं गायलं आहे असं म्हटलं.