अभिनेता प्रसाद खांडेकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. या कार्यक्रमामुळेच त्याच्या चाहत्यावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच प्रसाद आता मराठी चित्रपटांमध्येही रमला आहे. ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचं तो दिग्दर्शन करत आहे. याव्यतिरिक्त प्रसाद मराठी नाटकांमध्येही काम करताना दिसतो. आता त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून छोटा ब्रेक घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपट, नाटकांमधूनही प्रसाद प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान हे सगळं करत असताना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये उत्तम पात्र साकारत प्रेक्षकांना तो खळखळून हसवतो. आता प्रसाद अमेरिकेला निघाला आहे. यामागचं कारणही तितकंच खास आहे. ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामध्ये प्रसाद काम करत आहे. आता याच नाटकाचा अमेरिका दौरा आहे.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

आणखी वाचा – Video : “याला म्हणतात संस्कार”, मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीने केलं असं काही की…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “पैसा असूनही…”

नाटकाच्या दौऱ्यासाठी तो अमेरिकेला निघाला आहे. प्रसादने मुंबई विमानतळावरचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. प्रसादची पत्नी, आई, मुलगा त्याला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर आले होते. कुटुंबियांबरोबर त्याने सेल्फीही घेतला. तसेच या नाटकातील इतर सहकलाकारांबरोबरचे फोटोही त्याने शेअर केले आहेत.

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

प्रसाद फोटो शेअर करत म्हणाला, “गुड बाय मुंबई. ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकासाठी युएस टूरला निघत आहे”. प्रसादबरोबरच नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळेही या नाटकामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नम्रताचा पती व तिचा मुलगाही तिला सोडायला मुंबई विमानतळावर आले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem prasad khandekar us tour for marathi natak share photo with family see details kmd
Show comments