छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला. या कार्यक्रमातील कलाकारांनी तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता पुढील दोन महिने तरी हा कार्यक्रम प्रसारित होणार नाही. म्हणूनच या कार्यक्रमातील कलाकार त्यांना मिळालेल्या सुट्टीमध्ये स्वतःचा वेळ एण्जॉय करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

वनिता खरात पती सुमितसह गोव्याला गेली होती. तर निखिल बने त्याच्या कोकणातल्या गावी गेला होता. गौरव मोरे तर थेट कामानिमित्त परदेशात पोहोचला आहे. इतकंच नव्हे तर समीर चौघुलेंनीही व्हॅकेशन एण्जॉय करायचं ठरवलं. समीर मिळालेल्या वेळेमध्ये लेह-लडाखला पोहोचले होते. यादरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – “देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण…” सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा, म्हणालेली, “आम्ही अजूनही…”

समीर यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. दरम्यान प्राजक्ता माळीलाही या फोटोंवर कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. समीर यांचे फोटो पाहून ती म्हणाली, “दादा मिळालेल्या वेळेचा आनंद घ्या. मस्त एण्जॉय करा. जगातील प्रत्येक शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही पात्र आहात”.

आणखी वाचा – वडिलांचं निधन, शिक्षण करत नोकरी, कमी वयातच घराची जबाबदारी अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता म्हणतो, “बहिणींनी मला…”

तसेच चाहत्यांनी समीर यांना ट्रिप मस्त एण्जॉय करण्याचा सल्ला दिला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे काही कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये रमले आहेत. तर काहीजण त्यांच्या कुटुंबियांबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसत आहेत. तर दत्तू मोरे पत्नीसह हनिमूनला परदेशात पोहोचला आहे.

Story img Loader