छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामधील कलाकारांचा तर मोठा चाहता वर्ग आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. प्रियदर्शिनी या कार्यक्रमामध्ये साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात भाग पाडतात. इतकंच नव्हे तर तिने आता मराठी चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली आहे. आता समीर चौघुलेंनी प्रियदर्शिनीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९ जूनला प्रियदर्शिनीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह कलाकार मंडळींनी तिला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. प्रियदर्शिनीने तिचा वाढदिवस अगदी उत्तम सेलिब्रेट केला. यादरम्यान समीर चौघुलेंनी तिच्यासाठी शेअर केलेली पोस्ट विशेष लक्षवेधी ठरली. त्यांची पोस्ट पाहून प्रियदर्शिनीही भारावून गेली.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचा राहत्या चाळीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणतात, “तुझीही वेळ येईल आणि…”

समीर म्हणाले, “आमच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या भात्यातील आणखीन एक वेडसर बुद्धीमान तीर. नुकत्याच गाजलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटामध्ये तिने सर्वांनाच चकित केलं. उत्कृष्ठ डबिंग आर्टिस्ट असल्याने हिच्या गळ्यात अगणित अनेक आवाज वस्तीला असतात. आमच्या आवली लवलीच्या स्किटमध्ये अत्यंत भसाड्या आवाजात हक्काचा लाफ्टर मिळवणारी आमची प्रिया अवलिया आहे”.

आणखी वाचा – लेह-लडाखला पोहोचले समीर चौघुले, फोटो पाहून प्राजक्ता माळीची कमेंट, म्हणाली, “दादा…”

“शालेय कारकीर्दीत अत्यंत हुशार असलेल्या प्रियाने इंजिनीयरिंगची पदवी मिळवली आहे आणि त्या क्षेत्रात होऊ शकणारं करिअर सोडून कलाक्षेत्रात ती आली. उत्तम घोडदौड करत आहे. अनेक वर्ष मी प्रियाचा प्रवास बघत आहे. वाढदिवसाच्या दिवशी नवीन शुभ ड्रेस घातल्यावर पहिल्या पाच मिनिटांमध्येच त्या ड्रेसवर जांभळा डाग पाडण्याची क्षमता असणारी आमची प्रिया शब्दशः धडपडी आहे. अशा अतरंगी मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”. समीर यांच्या पोस्टवर प्रियदर्शिनीने कमेंट केली. ती म्हणाली, “दादा काय बोलू… तुम्ही माझ्याबाबत भरभरुन बोललात त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप प्रेम”.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem samir choughule share post on social media for priyadarshani indalkar see details kmd