‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सप्तपदी घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. मोजक्याच मंडळींच्या उपस्थित वनिताचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. कलाकारांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे वनिताच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…
शिवाली परब, नम्रता संभेराव, गौरव मोरे, निखिल बने, प्रसाद खांडेकर, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट यांसारख्या कलाकारांनी वनिताच्या लग्नामध्ये अगदी धमाल केली. शिवाली वनिताच्या लग्नाचे तिचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसत आहे. वनिताच्या लग्नात शिवालीने अगदी खास लूक केला होता.
शिवालीने फिकट आकाशी रंगाची साडी परिधान केली होती. यावर तिने पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. तर या लूकवर तिने परिधान केलेले दागिनेही विशेष लक्ष वेधून घेणारे होते. पण वनिताच्या लग्नात सर्वाधिक चर्चा शिवालीची रंगली असंच दिसत आहे. शिवालीने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिला अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था
वनिताचं झालं तुझं लग्न कधी? तुझं लग्न कधी आहे? जिचं लग्न होतं तिचे फोटोही पोस्ट कर अशा अनेक मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आता शिवालीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची प्रतिक्षा आहे. आताही शिवालीने वनिताच्या लग्नातील तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.