छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या शिवालीच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शिवाली सोशल मीडियाद्वारे तिचे विविध फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता तिने एका अभिनेत्याबरोबर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. अभिनेता निमिश कुलकर्णीबरोबरचा तिचा हा फोटो आहे. शिवाली व निमिश डेटला गेले होते. याचदरम्यानचा फोटो शिवालीने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
शिवालीने निमिशचा हात हातात पकडलेला या फोटोमध्ये दिसत आहे. तर निमिश अगदी गोड हसत आहे. शिवालीने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “माझ्या निब्बाबरोबर डेट. क्युट बेबी”. शिवालीच्या या फोटोची सध्या चर्चा रंगत आहे. शिवालीप्रमाणेच निमिशही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या काही स्किटमध्ये विविध पात्र साकारताना दिसतो.
आणखी वाचा – Video : महेश मांजरेकरांच्या लेकाचं हॉटेल पाहिलंत का? ‘या’ खास पदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार
सध्या निमिश स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेमध्ये काम महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर शिवाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सह मराठी चित्रपटांकडेही वळली आहे. शिवाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साकारत असलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडते. शिवाय तिच्या चाहतावर्गामध्येही आता प्रचंड वाढ झाली आहे.