‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सध्या तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. यावर्षी २ फेब्रुवारीला वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोढेंसह अगदी थाटामाटात लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी तिने सुमितबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर या दोघांची लगीनघाई सुरू झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वनिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.
वनिताने अभिनयक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फक्त ती मराठी कार्यक्रम, चित्रपटांपुरताच मर्यादित राहिली नाही. तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. शाहिद कपूरसह ‘कबीर सिंग’ चित्रपटामध्ये वनिताने साकारलेली भूमिका आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. सुमितलाही त्याच्या पत्नीचा अभिमान वाटतो.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये वनिताने सुमितबाबत भाष्य केलं. चाहते जेव्हा फोटो काढण्यासाठी गर्दी करतात तेव्हा सुमितला खूप अभिमान वाटतो असंही तिने सांगितलं. यावेळी सुमित कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे? असं वनिताला विचारण्यात आलं. यावेळी तिने सुमित अकाऊंटंट असल्याचं वनिताने सांगितलं.
वनिता म्हणाली, “तो एक अकाऊंटंट आहे. डिमार्टच्या हेट ऑफिसमध्ये तो अकाऊंटंट म्हणून काम पाहतो”. वनिता व सुमित या दोघांचंही क्षेत्र अगदी वेगळं आहे. पण दोघंही एकमेकांना अगदी उत्तम पद्धतीने समजून घेतात. वनिता व सुमित यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतरचं आयुष्य अगदी मस्त असल्याचंही वनिताने सांगितलं.