‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात व सुमित लोंढे २ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. वनिताचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. वनिता व सुमितच्या लग्नाला आता एक महिना झाला आहे. दोघंही सुखी संसारामध्ये रमले आहेत. इतकंच नव्हे तर वनिताने सुमितसह एक नवी सुरुवात केली आहे. या दोघांनी मिळून एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलद्वारे त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “रशियन मुलींचा वापर करुन…” सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचे पुन्हा एकदा गंभीर आरोप

वनिता व सुमित यांची लग्नानंतरची ही पहिलीच होळी होती. या दोघांनी होळी अगदी आनंदात साजरी केली. यादरम्यानचाच व्हिडीओ वनिताने तिच्या युट्यूब चॅनलद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वनिताच्या सासरच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये सुमितची आईही दिसत आहे.

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

होळीनिमित्त वनिताच्या सासूबाईंनी पुरणपोळी बनवली होती. या व्हिडीओमध्ये वनिता तिच्या सासूबाईंनी केलेल्या पुरणपोळी दाखवताना दिसत आहे. तर दुसरीकडे सासूबाईंविषयीचं प्रेम ती व्यक्त करताना दिसते. वनिता म्हणते, “या माझ्या सासूबाई आहेत. या नाही कारण मी यांना ही असं म्हणते. कारण सासूबाई म्हणजेच माझी आई आहे. मी हिला आईच म्हणते. तिने आज पुरणपोळ्या बनवल्या आहेत”.

आणखी वाचा – आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “आज सकाळी उठले आणि…”

“पुरणपोळ्या मला खूप आवडतात. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आम्ही या पुरणपोळ्या संपवणार आहोत”. असं या व्हिडीओमध्ये वनिता बोलताना दिसत आहे. वनिता व सुमितच्या घराची झलकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. स्वयंपाक घर, बेडरुम, वॉर्डरोब असं वनिताचं सुंदर घर आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem vanita kharat started her own youtube channel talk about mother in law watch video kmd