रंग, रुप किंवा देहरचनेवर तुमचं सौंदर्य किती चांगलं आहे हे ठरत नाही हे अभिनेत्री वनिता खरातकडे पाहिलं की लक्षात येतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिता नावारुपाला आली. पण या कार्यक्रमाशिवाय तिने मराठीसह हिंदी चित्रपटामध्येही काम केलं आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य नेमकं कसं आहे? हे जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. वनिताही तिच्या दिनक्रमाबाबत सोशल मीडियावर माहिती देताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : “मित्रानेच केला मित्रावर वार अन्…” विकास सावंत व किरण मानेंच्या मैत्रीत फुट, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भडकले

वनिता आपल्या मित्र-मंडळींबरोबर नेहमीच धमाल-मस्ती करताना दिसते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. ती मित्र-मंडळींबरोबर एका कॉफी हाऊसमध्ये गेली होती.

वनिता त्या कॉफी हाऊसमध्ये गेली खरी पण तिथल्या कॉफीची किंमत ऐकूनच ती थक्क झाली. तिने त्या कॉफी हाऊसमधील कॉफीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे फोटो शेअर केला. तसेच हा फोटो शेअर करत तिने चक्क त्या कॉफी हाऊसला एक मागणी केली.

ती म्हणाली, “कमी किंमतीची कॉफी आम्हाला द्या.” त्यानंतर तिने एका मैत्रिणीचा फोटो शेअर करत म्हटलं की, “श्रीमंत लोकांचे छंद श्रीमंत लोकांबरोबरच…” वनिताने आपल्या कामामधून वेळ काढत मित्र-मैत्रिणींबरोबर एकत्रित वेळ घालवला. यावेळी तिच्याबरोबर शिवाली परबही होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem vanita kharat talk about costly coffee and share photo on instagram see details kmd