‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्यांना कलाकारांना एक वेगळीच ओळख मिळाली. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे सारख्या कलाकारांच्या चाहतावर्गामध्ये तर प्रचंड वाढ झाली. पण त्याचबरोबरीने या कार्यक्रमात दत्तू मोरेसह भलताच भाव खाऊन गेला तो विराज जगताप. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये तो छोट्या-मोठ्या भूमिका साकारतो. पण त्याने साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराज अगदी सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. त्याने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. विराज बदलापूरमध्ये राहतो. पण काही वर्षांपूर्वी वडिलांचं निधन झाल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली. मात्र यादरम्यान त्याला त्याच्या कुटुंबियांनी बराच पाठिंबा दिला. त्याने याबाबतच आता सांगितंल आहे.

आणखी वाचा – “१५०० रुपये मानधन सांगून ७०० रुपये दिले अन्…” संकर्षण कऱ्हाडेने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणाला, “मी ते पैसे त्यांच्या…”

विराज म्हणाला, “आजी-आजोबा, माझे बाबा आम्ही सगळे एकत्र होतो. वृद्धापकाळाने आजीचं निधन झालं. त्यानंतर आजोबांचंही निधन झालं. काही वर्षांपूर्वी माझे बाबाही आम्हाला सोडून गेले. त्यानंतर माझ्या दोन बहिणींचा मला सर्वात जास्त पाठिंबा मिळाला. अकरावी, बारावीमध्ये असतानाच पार्ट टाइम नोकरी करण्याची सवय आम्हाला लागली. बाबांचं निधन झाल्यानंतर खूप मोठी पोकळी निर्माण झाली. पण माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी, माझ्या नातेवाईकांनी, शेजारच्या मंडळींनी, बहिणींनी मला कधीच काही वेगळं जाणवू दिलं नाही”.

आणखी वाचा – “नाटक, मराठी मालिकांमधून मला काढून टाकलं अन्…”, संकर्षण कऱ्हाडेचा मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्यावेळी रडलो कारण…”

“माझ्या एकट्यावरच आता जबाबदारी आहे, दडपण आहे याची मला जाणीव होत होती. परंतू या सगळ्या लोकांनी मला सांभाळून घेतलं. सगळ्यांची साथ असल्यामुळे बाबा गेल्यानंतर जे दडपण होतं त्याचा फारसा त्रास झाला नाही. मध्यंतरी माझ्याकडे काम नव्हतं, फार पैसे नव्हते तेव्हा माझ्या बहिणींनी मला खूप पाठिंबा दिला. घर खर्च, माझा स्वतःचा खर्च यासाठी त्यांनी सांभाळून घेतलं”. विराजने आतापर्यंत केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem viraj jagtap talk about his journey talk about life after father death see details kmd
Show comments