छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. यापैकी एक म्हणजे गौरव मोरे. गौरवने विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या त्याचे नवनवीन एकामागून एक चित्रपट प्रदर्शित होतं आहे. त्यामुळे आजकाल तो नेहमी चर्चेत असतो. असा हा लोकप्रिय गौरव नुकताच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने एक असा प्रसंग सांगितला; जो पाहून त्याला भरून आलं होतं.

भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये गौरव मोरेबरोबर रॅपिड फायर हा खेळ खेळण्यात आला. यावेळी गौरवला त्याच्या क्रशपासून ते आवडती गाडी असे अनेक प्रश्न विचारले गेले. यादरम्यान भार्गवीने त्याला विचारलं की, तुला आलेली सर्वात चांगली प्रतिक्रिया कोणती होती? यावर गौरव म्हणाला की, लहान मुलांनी माझं जास्त कौतुक केलंय. फोन करून ते बोलतात.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
youth on two wheeler seriously injured in collision with Pune bus
विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी; येरवड्यात अपघात

हेही वाचा – “L दाबला अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने सई ताम्हणकरला चुकून केला होता ‘हा’ मेसेज

पुढे एक किस्सा सांगत म्हणाला, “पण एक मला खूप छान आठवण आठवतेय. मी फिल्टरपाड्याच्या नाक्यावरती उभा होतो. तेव्हा एक मर्सिडीज आली, थांबली, काच खाली केली आणि आतमध्ये बसलेल्या माणसाने माझ्याकडे बघून अंगठा दाखवून बेस्ट असं केलं. एवढंच त्यांनी केलं. ही माझ्यासाठी सर्वात चांगली प्रतिक्रिया होती. तेव्हा मी नाक्यावर छोटी चड्डी घालून उभा होतो. मी त्यांना बघून हात जोडले आणि आभार मानले. मला खूप भरून आलं. म्हटलं एवढी मोठी गाडी थांबली आणि जे कोणी साहेब असतील त्यांनी हातवारे करून आपलं कौतुक केलं. याचा अर्थ आपलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं. माझ्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे.”

Story img Loader