‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमामुळेच प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आणि विनोदवीर म्हणून गौरव मोरे हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. मराठी नाटक, चित्रपट यासारख्या अनेक ठिकाणी अभिनयाची छाप उमटवणाऱ्या गौरव मोरेने नुकतंच प्राजक्ता माळीबद्दल एक वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरव मोरेला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणून त्याला ओळखले जाते. त्याचे लाखो चाहते आहेत. नुकतंच गौरवने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील मित्रमंडळींबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने सर्व कलाकारांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा : “कॉलेजमध्ये केलेली मारामारी, सरांचा फोन अन्…”, ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडेने सांगितला ‘तो’ किस्सा

“प्रसाद खांडेकर हा माझा कॉलेजापासूनचा मित्र आहे. त्यामुळे त्याची मैत्री पूर्वीपासूनच घट्ट आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सहकलाकारांमध्ये नम्रता संभेराव ही अतिशय हुशार अभिनेत्री आहे. ती ज्या पद्धतीनं भूमिका निभावते, ते जबरदस्त आहे. समीर चौगुले हा दादा आहे. मला जुगलबंदीसाठी ओंकार भोजने आवडतो. तो भन्नाट अभिनेता आणि उत्तम श्रोताही आहे”, असे गौरव मोरे म्हणाला.

यानंतर त्याला प्राजक्ता माळीबद्दल विचारले असता त्याने फारच उत्तम पद्धतीने उत्तर दिले. “माझी प्राजक्ता माळीशी खास मैत्री आहे. तिचं तिथं असणं हे आम्हा सगळ्यांना आवडतं. कारण तिला जे सुचतं ते कुणालाही सुचणार नाही. ती खूप छान पद्धतीने प्रोत्साहन देते”, असे गौरव मोरेने म्हटले.

दरम्यान सध्या गौरव हा विविध चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. गौरव हा ‘अंकुश’, ‘बॉईज ४’ आणि ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यात ‘अंकुश’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra gaurav more talk about prajakta mali and other actors friendship nrp