महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसतात. या कार्यक्रमाच्या स्किटमधील कोहली फॅमिली ही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटवरील एक रॅप सध्या व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच या स्किटसाठी किती वेळ लागतो, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब ही कायमच प्रसिद्धीझोतात असते. नुकतंच शिवालीला कोहली फॅमिलीवरुन व्हायरल होणाऱ्या रॅपबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्याबरोबर तिला यासाठी नेमका किती वेळ लागतो याबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावर तिने उत्तर दिले. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले.
आणखी वाचा : ‘मी अवली लवली…’ वरील ‘त्या’ रिलवर शिवाली परबने दिली प्रतिक्रिया, म्हणाली “विराट कोहलीने…”

शिवाली परब काय म्हणाली?

“महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कोहली फॅमिलीवर स्किट करताना आम्हालाच फार मजा येते. पण ते करणं फार कठीण आहे. कारण जर ते फसलं तर ते फसणार स्कीट आहे.

त्यामुळे खूप विचार करुन, मेहनत घेऊन आणि काम करुन समीर दादा ती स्क्रिप्ट लिहितो. त्यामुळे त्याला तितका वेळ द्यावा लागतो. यासाठी साधारण काही आठवड्यांचं कालावधी द्यावा लागतो.

त्याला काही तरी नवीन आणि बेस्ट सुचावं. आम्ही प्रत्येकवेळी त्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच आम्ही लवकरच तुम्हाला भेटायला येऊ”, असेही शिवाली यावेळी म्हणाली.

दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या स्किटमधील कोहली फॅमिलीही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटमधील सगळ्या पात्रांची नावे आणि संवादाचा शेवटही ‘ली’ या अक्षरानेच होतो. समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव व प्रियदर्शनी हे कलाकार अचूक टायमिंग साधत या स्किटद्वारे विनोदनिर्मिती करतात. त्यांच्या या स्कीटवर केलेल्या धम्माल डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.