महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमाच्या अनेक स्किटमधील कोहली फॅमिली ही प्रचंड लोकप्रिय आहे. सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके यांनी याच फॅमिलीचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या स्किटमधील कोहली फॅमिलीही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटमधील सगळ्या पात्रांची नावे आणि संवादाचा शेवटही ‘ली’ या अक्षरानेच होतो. समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव व प्रियदर्शनी हे कलाकार अचूक टायमिंग साधत या स्किटद्वारे विनोदनिर्मिती करतात. नुकतंच सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके यांनी या स्किटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “तो आमच्या कार्यक्रमात आला तेव्हा…” गौरव मोरेने सांगितला रणवीर सिंगबरोबर काम करण्याचा अनुभव
या व्हिडीओत कोहली फॅमिली ही डॉक्टरकडे आल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी डॉक्टरांचे पात्र समीर चौगुले साकारत आहे. तर प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव व प्रियदर्शनी हे कलाकार कोहली फॅमिलीमधील एक-एक पात्र साकारताना दिसत आहेत. यावेळी ते त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने विनोद करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “तो पैशासाठी गेला…” ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मागील एक्झिटचं खरं कारण समोर
हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने यावर हसण्याचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. तर अभिनेत्री स्पृहा जोशीने ‘आणि अखेर ते परत आलेत’, असं म्हणत कमेंट केली आहे. तसेच श्रृती मराठेनेही या व्हिडीओवर हसतानाचे आणि फायर असे दोन इमोजी शेअर केले आहेत. दरम्यान सध्या या कोहली फॅमिलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.