‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, ओंकार राऊत यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा शो म्हणून याची ओळख आहे. या कार्यक्रमातील अभिनेता ओंकार राऊत याने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता ओंकार राऊत हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो परदेशी नागरिकाचे पात्र साकारताना दिसत आहे. याचा एक व्हिडीओही त्याने पोस्ट केला आहे. याचे काही फोटोही तो शेअर करताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्याने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
आणखी वाचा : “मला तू हवी आहेस…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘त्या’ कलाकाराच्या पोस्टवर सुनील तावडेंच्या लेकाची कमेंट चर्चेत
ओंकार राऊतची इन्स्टाग्राम पोस्ट
विश्वचषकात इंग्लंडच्या विरुद्ध झालेल्या पराभवाबद्दल मला खूप वाईट वाटते!!! बॉब
पण मला एका इंग्रजी माणसाचे पात्र साकारायला नेहमीच आवडते!!!
धन्यवाद हस्यजत्रा!!!
हीच हास्यजत्रेची गंमत आहे. वेगळी पात्र करायला मिळणं याहून दुसरं सुख नाही !!!, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : उर्फी जावेद चक्क साडी नेसून पोहोचली विमानतळावर, वाऱ्यामुळे पदर सरकला अन्…
ओंकारच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. बॉब असे तिने यावर म्हणत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तर अभिनेता मनमीत प्रेमने कमेंट करताना म्हटले की आता मी सांगू शकतो की डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत. त्यावर ओंकार राऊतने हसतानाचे इमोजी शेअर करत रिप्लाय दिला आहे.