‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, ओंकार राऊत यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा शो म्हणून याची ओळख आहे. नुकतंच या कार्यक्रमातील अभिनेता ओंकार राऊत याने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता ओंकार राऊत हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. येत्या भागात तो आपल्या स्त्री पात्र साकारताना दिसणार आहे. या निमित्ताने त्याने साकारलेल्या स्त्री पात्राचे काही फोटो शेअर केले आहेत. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
ओंकार राऊतची पोस्ट
“महिलांचे जीवन
१. लाजणे
२. मिरवणे
३. घायाळ करणेस्त्री पात्र करायची सुप्त इच्छा हास्यजत्रे ने पूर्ण केली या साठी सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांचे मनापासून आभार! स्त्री सादर करायचा एक सालस प्रयत्न!हो! स्त्रियांना तयार व्हायला वेळ लागतो आणि तो वेळ त्यांनी घ्यावा!”, असे त्याने यात लिहिले आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण
ओंकारच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने या पोस्टवर एक कमेंट केली आहे. तू हिला पटवं, एकदम फटका, असे ऋतुजा बागवेने म्हटले आहे. तर अभिनेता शुभांकर तावडे याने ‘मला तू हवी आहेस’, अशी कमेंट केली आहे. त्यावर ओंकारनेही हसण्याचे आणि हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.