सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षक भरभरुन दाद देतात. प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवण्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी ठरला. शिवाय कार्यक्रमामधील कलाकारांनीही प्रेक्षकांना अगदी वेड लावलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ काही पात्र व कलाकार प्रचंड गाजतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत.

आणखी वाचा – आठ वर्षांचा संसार, पहिल्या पत्नीशी घटस्फोट, एक मुलगी अन्…; नवीन ‘तारक मेहता’ने थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रभाकर यांनी आतापर्यंत उत्तमोत्तम पात्र साकारली. स्त्री वेशातही त्यांनी स्किट करत प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं. कोकणी शैलीत विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. त्यांचं ‘शालू’ हे गाणं तर आजही गाजतं.

पाहा व्हिडीओ

‘शालू’ या गाण्यावर प्रभाकर यांचा नाच तर अगदी लोकप्रिय आहे. आता या गाण्याची भूरळ परदेशातील लोकांनाही पडली आहे. प्रभाकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एका कार्यक्रमामधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते ‘शालू’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

प्रभाकर यांच्याबरोबरच परदेशातील काही मंडळी ‘शालू’ गाण्यावर डान्स करत आहेत. प्रभाकर यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “जेव्हा परदेशातील विद्यार्थी शालू गाण्यावर डान्स करतात”. प्रभाकर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच गाजत आहे. शिवाय समीर चौघुले यांनीही या व्हिडीओ कमेंट केली आहे. “आमचा प्रभा इंटरनॅशनल हिरो आहे. लव्ह यू प्रभा”. असं समीर चौघुले यांनी म्हटलं. तर अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओच कौतुक केलं आहे.

Story img Loader