‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विनोदवीर पृथ्वीक प्रताप अलीकडे त्याच्या रिल्समुळे चर्चेत असतो. पृथ्वीकने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पृथ्वीक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. सध्या पृथ्वीकची इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट चर्चेत आहे.

पृथ्वीकने एका ठिकाणी पोहोचण्यासाठी एक उबेर कॅब बूक केली होती. ती बूक केल्यानंतर त्याला एक मेसेज आला. त्या मेसेजचा स्क्रिनशॉट त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्या स्क्रिनशॉटमध्ये असं लिहिलंय की, “तुमचा ड्रायव्हर येत आहे. इम्तियाज अली लवकरच बजाज रिकॉम्पॅक्टच्या येथे पोहोचतोय. तिथे पोहोचल्यानंतर शुल्क सुरू होण्यापूर्वी तो तीन मिनिटे तिथे प्रतीक्षा करेल.” हा मेसेज पाहताच पृथ्वीकने त्याला कॅप्शन देत लिहिलं, “जिंदगी का इतना भी तमाशा नही बनाना था के इम्तियाज अली खूद पिक अप के लिए आए.” (“आयुष्याचा एवढा तमाशा करून घ्यायचा नव्हता की इम्तियाज अली स्वत: घ्यायला येईल”)

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा… “सन सनन…”, २३ वर्षानंतर व्हायरल झालेल्या अशोका ट्रेंडबद्दल करीना कपूर म्हणाली, “तेव्हा माझ्या चेहऱ्यावर…”

पृथ्वीकने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. पृथ्वीकने काल सोशल मीडियावर प्रथमेश परब, मनमीत पेम, विशाल जाधव, कॉमेडी इन्फ्लुएंसर मॅन्डी यांच्याबरोबर एक डान्स रीलदेखील शेअर केली होती. ‘इल्लुमिनाटी’ या गाण्यावर त्यांनी हटके स्टेप्स करत डान्स केला आहे. पृथ्वीकच्या या रीलचीदेखील सगळीकडे चर्चा आहे.

हेही वाचा… “अतिशय वेगळा असा आळस…”, ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केला गणीबरोबर ‘खास’ व्हिडीओ; म्हणाली…

दरम्यान, पृथ्वीकच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर पृथ्वीक शेवटचा ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात झळकला होता. आता अभिनेता दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून, त्यामध्ये बरेच मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यामध्ये पृथ्वीक प्रतापसह अभिनेत्री सायली संजीव, सुहास शिरसाट या कलाकारांचाही समावेश आहे.

Story img Loader