‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. अभिनेता ओंकार राऊतला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली. आज ओंकार राऊत त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त हास्यजत्रेतील आणि मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या होत्या. ओंकार राऊतसाठी अभिनेते समीर चौघुले यांनी खास पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “आमच्या नाटकाची बस…”, टोलच्या समस्येनंतर मुंबई-पुणे महामार्गावर ऋजुता देशमुखला आला ‘असा’ अनुभव

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
Devendra Fadnavis says We Eknath Shinde Ajit Pawar Shares Funny Memes
“शपथविधीअगोदर खूप मीम्स आले, आम्ही तिघे…”, फडणवीसांनी सांगितलं ट्रोलर्सचं आवडतं मीम; अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Uday Samant Post About Loksatta
Uday Samant : “‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
Sashshank Ketkar
“म्हणून हा चॉकलेट केक…”, शशांक केतकरच्या मुलाचे बोबडे बोल ऐकलेत का? असा साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस

आपल्या लाडक्या सहकलाकाराला आणि मित्राला शुभेच्छा देण्यासाठी समीर चौघुले यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ओंकार राऊतच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील अनेक प्रसंग सांगितले आहेत. तसेच ओंकार आणि माझ्यात एक खास नाते असल्याचे समीर चौघुलेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : “भरलेलं नाट्यगृह, प्रेक्षकांचं प्रेम अन्…”, प्रिया बापटने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “यापेक्षा सुखद अनुभव…”

समीर चौघुले यांची पोस्ट

@onkar_raut वाढदिवसाच्या फुल्टू शुभेच्छा…गेल्या वर्षी तुझ्या वाढदिवसानिमित्ताने काही कारणास्तव पोस्ट टाकली नाही…तुला कारण माहितीय…पण या वर्षी मी ही संधी गमावणार नाही…….ओंकार, ओंकी , राजदीप, ओम ..साधारणतः दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला रंगकर्मी..रुपारेल महाविद्यालयात एकांकिका क्षेत्रातील मोठं नाव, नाटकावर मनापासून प्रेम करणारा असल्याने एखाद दोन प्रहसनातच तो हास्यजत्रेत रुळला कारण, आमच्या ओंक्याची ग्रास्पिंग करण्याची क्षमता अफाट आहे…..आणि सगळ्यात महत्वाचं “शिकण्याची आणि इतरांनी केलेल्या सूचना, लक्षात आणून दिलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारण्याची वृत्ती आहे…प्रत्येक स्किटनंतर पाटी कोरी करून गोस्वामी सरांसमोर नव्याने धडे गिरवायला बसण्याची वृत्तीच तुला अजून मोठं करणार ओंकार … ओंकारचं आणि माझं खास नातं आहे…understanding आहे…मला स्वतःला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात…हॉलिवूडची प्रत्येक अँक्शन फिल्म आम्ही एकत्र बघतो….क्रिकेट आमच्या दोघांचाही श्वास आहे…अरिजित सिंहचे “खैरियत पूछो”हे गाणं आम्हा दोघांना ही प्रचंड आवडत…..आमच्या राऊतला “कंटाळा” आणि “आता कशाला?” हे शब्द खूप आवडतात…वर वर अत्यंत बेपर्वा आणि कूल वाटणारा ओंकार..स्वतःच्या कामाबद्दल अत्यंत सिरियस आहे…एखादे स्किट पडल्यावर स्वतःवरच चिडणारा ओंकार मी जवळून बघितलाय….वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा आमचा मनोमिलन स्वरछेडे आतून खूप हळवा आहे…अशा या मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..

हेही वाचा : HBD Mahesh Babu : “सेटवर प्रेम, ४ वर्ष गुपचूप डेटिंग अन्…”, ‘अशी’ आहे सुपरस्टार महेश बाबू आणि मराठमोळ्या नम्रता शिरोडकरची फिल्मी लव्हस्टोरी

दरम्यान, समीर चौघुले यांच्या पोस्टवर ओंकार राऊतने “दादा! काय बोलू आणि काय नको असे झाले आहे…खूप खूप धन्यवाद! तुझ्यामुळेच सगळं झालंय लव्ह यू” अशी कमेंट करत त्यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader