‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातला प्रत्येक विनोदवीर आता घराघरात पोहोचला आहे. प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात आपल्या विनोद शैलीमुळे वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकही या विनोदवीरांवर भरभरून प्रेम करताना पाहायला मिळत आहे. समीर चौघुले यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. समीर चौघुले यांनी तयार केलेलं ‘उंदीर मांजर पकडींगो’ हे गाणं चांगलचं गाजलं. अनेकांनी त्यावर रील्स व्हिडीओही बनवले. मात्र, हे गाण नेमक त्यांना कसं सूचलं? एका मुलाखतीत चौघुले यांनी यामागची कहाणी सांगितली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी चौघुलेंनी ‘उंदीर मांजर पकडींगो’ या गाण्यामागचा किस्सा सांगितला आहे. चौघुले म्हणाले ‘याला मी फक्त बालिशपणा म्हणेत. यात कॉलेजचा खूप मोठा हात आहे. कॉलेजपासून मला वेगवेगळे आवाज काढायची खूप सवय होती. प्राण्यांचे नाही वस्तूंचे आवाज काढायची. मी एनर्जी ड्रिंक उघडतानाचा आवाज, मोबाईलचा आवाज काढायचो कुकरची शिट्टीचा आवाज काढून आईला गोंधळून टाकायचो.
समीर चौघुले पुढे म्हणाले ‘ताल चित्रपटातलं एक गाणं आहे. ते ऐकल्यावर काही कळत नाही नेमकं काय बोलतायत. मलाच नाही अनेकांना नाही कळत. आपण आरत्या चुकतो. बरेच जण चुकीचा शब्द म्हणतात. फळीवर वंदना वगैरे. तेच गाणं म्हणताना होतं. अनेक गाणी म्हणताना आपण आपण चुकीचा शब्द वापरतो. अनेक वर्षांपासून आपण हेच करत आलो आहोत.
हेही वाचा-‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ‘हा’ आहे चिडका बिब्बा; समीर चौघुले म्हणाले…
चौघुले पुढे म्हणाले “आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आए हे गाणं आपण चुकीचं म्हणतो. पण आपण एकदम प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष ते म्हणत आलो आहोत. हे गाणं ऐकल्यावर माझ्या पहिल्यांदा डोक्यात काय आलं तर हे उंदीर मांजर पकडींगो. त्यामुळे मी ते लिहिलं. आणि लोकांना पटलं म्हणून लोकांना ते आवडलं. कारण अनेकांच्या मनात तेच होते शब्द मी फक्त त्याला दिशा दिली. आता पुढच्या आठवड्यात ‘लोचन मजनू’ येतंय. आय डोन्ट नो व्हॉट यू से यावर ते गाणं केलं आहे. तेही लोकांना आवडेल”