सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच प्रसिद्धीझोतात असतो. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची ताकद असणाऱ्या कलाकारांमधील एक म्हणजे दत्तू मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे त्याचे नशीबच पालटले. आज तो घराघरात प्रसिद्ध आहे. दत्तू मोरेने नुकतंच त्याचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अभिनेते समीर चौगुले यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
समीर चौगुले हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी दत्तू मोरेचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : ‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर
समीर चौगुलेंची पोस्ट
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दत्ता मोरे…..आमचा आणि अख्या जगाचा अत्यंत लाडका दत्तू…अत्यंत प्रेमळ आणि निरागस..आणि तीच निरागसता पूर्णपणे त्याच्या अभिनयात उतरते..
चेहराभर दाढी असूनही ती दाढी त्याचा निरागसपणा लपवू शकत नाही हे आमच्या दत्तूचं यश आहे…. दाढी असूनही अख्ख्या जगाने स्वीकारलेला लहान मुलगा अशी आमच्या दत्तूची ओळख आहे…चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा आणून संवाद फेकणे हा आमच्या दत्तूचा हातखंडा आहे…तो स्वतः सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या “वेट क्लाउड प्रोडक्शन”मध्ये प्रोडक्शनचं ही काम अत्यंत तन्मयतेने करतो..
दत्तूच्या नावावरून त्याच्या चाळीचं नाव ठेवण्यात आलं ही आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.. यासाठी दत्तू चाळीतल्या सर्व बंधू-भगिनींचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो… अशा या गोड निरागस दत्तूला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… दत्तू तुला आयुष्यात सगळं काही मिळो…..हॅप्पी बर्थडे मित्रा…..खूप प्रेम”, असे समीर चौगुलेंनी म्हटले आहे.
आणखी वाचा : स्वप्निल जोशीने झोमॅटो अॅपबद्दल केली तक्रार, ट्वीट करत कंपनी म्हणाली “यावर उपाय…”
दरम्यान दत्तू मोरे हा कायमच विविध कार्यक्रमामुळे चर्चेत असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. या कार्यक्रमात त्याने साकारलेल्या विविध पात्रामुळे त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे कार्यक्रमामधील लाडका विनोदवीर म्हणून त्याला ओळखले जाते.