Prithvik Pratap Married to Prajakta Vaikul: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे. पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी साधेपणाने लग्नगाठ बांधली. त्याने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वीकने लग्नातील फोटो शेअर करताच त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहतेच नाही तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार आणि मराठी सिनेसृष्टीतील मंडळी पृथ्विक व प्राजक्ताचे अभिनंदन करत आहेत. शिवाली परब व प्रसाद खांडेकर यांनी पृथ्वीकसाठी खास पोस्ट केल्या आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप गुपचूप अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

“मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. अभिनंदन..आय लव्ह यू पृथ्वीक”, अशी पोस्ट शिवाली परबने केली आहे.

शिवाली परबची पोस्ट

प्रसाद खांडेकरने प्राजक्ता व पृथ्वीकचा फोटो शेअर करून ‘नांदा सौख्य भरे’ असं लिहून शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचं नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?

प्रसाद खांडेकरची पोस्ट

पृथ्वीकने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘मी पाहिलेले हे लग्नातील सर्वात सुंदर फोटो आहेत’, अशी कमेंट सारंग साठ्येने केली. तर, सध्या मी सर्वात जास्त आनंदी आहे, अशी कमेंट श्रुती मराठेने केली. ‘अभिनंदन गोड जोडी’ असं म्हणत अमृता खानविलकरने शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – “आम्ही नॉमिनेट झाल्यावर…”, जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणच्या कुटुंबाला सांगितले त्याचे किस्से; पाहा व्हिडीओ

अभिजीत केळकर, अक्षया नाईक, अभिजीत खांडकेकर, शुभांकर तावडे, सायली संजीव, ऋषी सक्सेना, अमृता देशमुख, वनिता खरातचा पती सुमित लोंढे यांनी पृथ्वीक व प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra team congratulates prithvik pratap married to prajakta vaikul hrc