मागील कित्येक वर्षांपासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. यातील प्रत्येक विनोदवीरांना प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून जगभरात आहे. असा हा मोठा चाहता वर्ग असलेल्या कार्यक्रम आता गणेशोत्सवानिमित्ताने प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आला आहे.

हेही वाचा – ‘जवान’ फेम संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर करणार लग्न? चर्चांना उधाण

stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mukta barve entry in colors marathi serial
Video : ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री! जबरदस्त लूक अन् प्रोमोने वेधलं लक्ष
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल

काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीर परदेशातील आपल्या चाहत्यांना पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. २३ दिवसांचा हा अमेरिकेचा दौऱ्या होता. या दौऱ्यावरून परत येताना हे विनोदवीर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी सज्ज झाले. १४ ऑगस्टपासून या कार्यक्रमाच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली. सोमवार ते गुरुवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येऊ लागला. पण आता गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांना खास भेट हा कार्यक्रम देत आहे. म्हणजेच लाडकी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सलग ८ दिवस आता प्रेक्षकांना हसवणार आहे.

हेही वाचा – “भीती वाटली पण…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने शेअर केला मालिकेच्या शुटींगदरम्यानचा अनुभव, म्हणाली…

गणेशोत्सवानिमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रात्री ९ वाजता असा सलग ८ दिवस पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमा नुकताच ‘सोनी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: परिणीती चोप्रा पापाराझींवर भडकली; हात जोडून म्हणाली, “मी तुम्हाला…”

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा जसा चाहता वर्ग आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमातील विनोदवीरांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. प्रत्येकांने आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनं जिंकली आहेत. त्यामुळे हे विनोदवीर नेहमी चर्चेत असतात.