‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच प्रसादने काल लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोला खास सरप्राइज दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने लग्नाच्या वाढदिवसाच्या सरप्राइजचा व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. प्रसादने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो बायकोचे डोळे झाकून सरप्राइज देताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोला स्कूटी गिफ्ट केली आहे. याचा व्हिडीओ शेअर करत प्रसादने लिहिलं आहे, “अल्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट या संपूर्ण प्रवासात तुझी साथ आहे…तुझ्या संगतीशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं आणि शक्य होणार ही नाही…आज लग्नाचा दहावा वाढदिवस अजून खूप दशक पार करायची आहेत…बाकी माझी तब्येत, माझं शेड्यूल या बाबतीतल्या तुझ्या तक्रारी लवकरच सोडवेन…”

हेही वाचा – “…तर मला वाटतं मी अभिनयाचं दुकानचं बंद केलं पाहिजे”, अभिनेते उपेंद्र लिमये यांचं वक्तव्य

पुढे प्रसादने लिहिलं आहे, “तुला नेहमी मी सरप्राइज द्यावं असं वाटतं, पण मला एवढं कोळून प्यायली आहेस की मी काय सरप्राइज देणार आहे हे तू आधीच ओळखतेस. त्यामुळे ते सरप्राइज राहतच नाही…पण मला खात्री आहे आजच हे स्पेशल सरप्राइज तू नक्कीच गेस (Guess) केलं नसशील…हा आनंद आणि हे प्रेम असंच वाढत राहू दे…अप्पू…शेवटी माझं आवडत गाणं तुझ्यासाठी…आपकी मंज़िल हूँ मैं…मेरी मंज़िल आप हैं…क्यों मैं तूफाँ से डरूँ…मेरा साहिल आप हैं…कोई तूफानों से कह दे…मिल गया साहिल मुझे…आय लव्ह यू अल्पा आणि लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा…”

दरम्यान, प्रसादच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समीर चौघुले, माधव देवचक्के, रसिका वेंगुर्लेकर अशा अनेक कलाकारांनी प्रसाद आणि त्याच्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajtra actor prasad khandekar gave his wife a special surprise on occasion on wedding anniversary pps