अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होती. यासाठी ती लंडनला गेली होती. आता पुन्हा एकदा भारतात परतल्यानंतर ती आपल्या कामाला लागली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या चित्रीकरणालाही प्राजक्ताने सुरुवात केली आहे. सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं तिला आवडतं. म्हणूनच आज जागतिक अन्न दिनाच्यानिमित्ताने सगळ्यांना तिने खास शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचबरोबरीने खास व्यक्तीबरोबर फोटोही शेअर केले आहेत.
प्राजक्ता सतत आपल्या कामामध्ये व्यग्र असते. पण त्याचबरोबरीने आवडत्या ठिकाणी फिरणं, तेथील प्रत्येक पदार्थांची चव घेणं प्राजक्ताला आवडतं. जागतिक अन्न दिनाच्यानिमित्ताने विविध पदार्थ खातानाचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
प्राजक्ताने खास व्यक्तीसाठी पोस्टही शेअर केली आहे. प्राजक्ताबरोबर जेवण्यासाठी, तिला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी या व्यक्तीने पुणे ते मुंबई असा प्रवास केल्याचंही प्राजक्ताने आपल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. तसेच मन लावून खा, सम्यक आहाराचं सेवन करा असा सल्ला तिने चाहत्यांना दिला आहे.
आणखी वाचा – “चित्रपटसृष्टीतील सर्वात बुलंद आवाज म्हणजे…” राज ठाकरेंकडून ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं भरभरून कौतुक
प्राजक्ता म्हणाली, “त्या मित्रांचंही कौतुक जे फक्त तुमच्याबरोबर जेवण्यासाठी तसेच तुम्हाला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी पुणे ते मुंबई असा प्रवास करतात. भाऊ तू खूप खास आहेस.” प्राजक्ताची ही पोस्ट पाहून तिचा हा भाऊ असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्राजक्ताच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.