छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमातील कलाकारांवरही सर्वच प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने त्यातील एका हास्यवीराने पोस्ट शेअर केली आहे.

मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने अमेरिकेतील रस्त्यावर कुर्ता घालून फिरण्याचे कारण सांगितले आहे.
आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”

पृथ्वीक प्रतापची पोस्ट

“अमेरिकेला येण्यासाठी ची सगळी तयारी सुरू असताना आई अचानक म्हणाली ‘मला पण घेऊन चल ना अमेरिकेला’ आणि तिच्या या वाक्यावर तिला काय उत्तर देऊ हे मला कळेच ना…

खूप विचार केला आणि लक्षात आलं की आता सध्या तरी आई ला प्रतिकात्मक रूपे अमेरिकेत घेऊन जाऊ शकतो म्हणून आज न्यूयॉर्क शहर फिरत असताना आईच्या साडी पासून बनवलेला कुर्ता घातला आणि सगळं शहर पिंजून काढलं तेवढच आपलं आई आपल्या सोबत असल्याची फीलिंग.

बाय द वे इथे अमेरिकेत तसं वातावरण थोडं गोंधळात पाडणारं आहे मध्येच ऊन लागत मध्येच पाऊस त्यामुळे तब्येतीवर होणारा परिणाम… त्यात सतत चा प्रवास, लागोपाठ शो यामुळे आलेला थकवा… हे सगळं आज जरा कमी झालं …
कारण ऊन, पाऊस, थकवा, आजारपण हे आपलं काहीच बिघडवू शकत नाही जर आपण आईच्या पदरा खाली असू. मिस यू अम्मा

तळटीप : लवकरच आई ला अमेरिका वारी घडवेन त्यामुळे चिंता नसावी”, अशी पोस्ट पृथ्वीक प्रतापने केली आहे

आणखी वाचा : “माझा प्रयोग होता अन्…” वंदना गुप्तेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यात घुसवलेली गाडी; म्हणाल्या “त्यांचे सुरक्षारक्षक…”

दरम्यान पृथ्वीक प्रतापच्या या पोस्टवर अभिनेता स्नेहल शिदमने कमेंट केली आहे. खूप गोड लिहिलंस दादा, असे तिने म्हटले आहे. तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader