छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो पाहिला जातो. अनेक कलाकारांना या शोमधून प्रसिद्धी मिळाली. अभिनेता पृथ्विक प्रतापही याच शोमुळे घराघरात पोहोचला. हास्यजत्रेतून प्रेक्षकांना हसवल्यानंतर पृथ्विक पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेतही झळकला होता. परंतु, अवघ्या तीनच महिन्यात सोनी मराठीवरील या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतून ९०च्या दशकातील पोस्ट ऑफिसचा काळ प्रेक्षकांना अनुभवता आला. ही मालिका बंद झाल्यानंतर कलाकारांकडून १९९७ सालातील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला गेला. याच निमित्ताने पृथ्विक प्रतापनेही त्याचे ९०च्या दशकातील फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना

हेही वाचा>> Video: दबंग महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर नागराज मंजुळेंनी बनवला रील; काठी उडवली, गोल फिरवली अन्…; व्हिडीओ व्हायरल

पृथ्विक प्रताप पोस्टमध्ये काय म्हणाला?

२ एप्रिल २०२३ ला ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ चा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्या निमित्ताने १९९७ सालचे फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आणि आज दुपार पर्यंत खूप शोधाशोध करुनही मला १९९७ सालचा माझा एकही फोटो मिळाला नाही. पण एक अत्यंत महत्त्वाची वस्तू सापडली ती म्हणजे ‘माझ्या वडिलांनी माझ्या आईला लिहीलेली पत्र’ …१९९३ ची ही पत्र…

बाबाला कर्करोग असल्यानं तो उपचारासाठी मुंबईच्या एका रुग्णालयात अॅडमिट होता. अंधेरीत आमच्या नातेवाईकांकडे बाबा महिना-दोन महिना राहिला होता…नातेवाईकांवर जास्त भार नको म्हणून आई माझ्या वडिलांपासून बऱ्यापैकी लांब राहत होती.

कधी तिच्या आई वडिलांकडे सूरतला, कधी सासू सासऱ्यांकडे गावी, कधी भावाकडे, कधी पुण्याच्या भाड्याच्या घरात… आणि या धावपळीत दोन आठवड्यातून एकदा-दोनदा त्यांची भेट होत असे.

पण त्यांची एकमेकांसाठीची काळजी, प्रेम, माया आणि सगळ्या सगळ्या भावना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा जो होता तो म्हणजे ‘पत्र’.

३ एप्रिल २०२३ला ही सगळी जुनी पत्र जी आईने बाबाला आणि बाबाने आईला लिहीली होती ती पहिल्यांदा वाचली. डोळे पाणावले, थोडा स्तब्ध झालो, कधी चेहऱ्यावर स्मित आलं, कधी अगदीच गहिवरून आलं.

सगळी पत्रं वाचून काढली…सगळे क्षण खऱ्या अर्थाने त्या त्या काळात जाऊन अनुभवले…जगलो…

पुढे अल्पावधीत बाबा निधन पावला आणि हा पत्रव्यवहार कायमचा थांबला. सगळा पसारा आवरून शांत बसलो असताना एक गोष्ट लक्षात आली…तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी ते जास्तीत जास्त मेंदू पर्यंत पोहोचेल पण पत्रांसारखं मनाचा ठाव कधीच घेऊ शकणार नाही.

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ च्या निमित्ताने पोस्टाच्या जवळ जाऊ शकलो आणि पत्रांचं महत्त्व समजू शकलो…

हेही पाहा>> “…तरी शेवटी डोळ्यांत अश्रूच येतात” नागाचैतन्यच्या डेटिंगच्या चर्चांवर समांथाचं भाष्य, म्हणाली, “या गोष्टीमुळे मला…”

पृथ्विक प्रतापच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Story img Loader