‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला. आता या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांची एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका प्रसारित होणार म्हटल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार असल्याच्या विविध चर्चा रंगत होत्या. आता या चर्चांवर समीर चौघुले यांनी उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “आम्ही दोघंही सिगरेट व दारू…” रितेश देशमुखने खासगी आयुष्याबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

What Nitin Gadkari Said?
Nitin Gadkari : “तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आमचा पाठिंबा, त्या नेत्याने..”, नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
PM Narendra Modi Jalgaon Lakhpadi didi program
PM Narendra Modi Jalgaon: महाराष्ट्राच्या संस्काराचा जगभरात प्रसार; लखपती दीदी कार्यक्रमात मोदींनी केला पोलंडच्या कोल्हापूर स्मारकाचा उल्लेख

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ जानेवारीपासून प्रसारित होणार आहे. या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसतील. शिवाय अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये समीर चौघुलेंनी म्हटलं की, “‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेचे प्रोमो जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. तुम्ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का बंद करत आहात? असंही विचारण्यात आलं.”

आणखी वाचा – लग्न झालं तरीही बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नाना पाटेकरांचं होतं अफेअर, दुसऱ्या लग्नाची बोलणी सुरू होताच…

“पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार हा कार्यक्रम असणार आहे. तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार ”’पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका असणार आहे. शिवाय या मालिकेची कथाही खूपच भन्नाट आहे.” म्हणजेच आता आठवड्यातील फक्त तीन दिवस प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहता येणार आहे.