‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व सुरू झाले आहे. मराठी अभिनेते सचिन खेडेकर या पर्वाचे होस्ट आहेत. दर शनिवारी कार्यक्रमात खास पाहुणे येत असतात. यंदाच्या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम येणार आहेत. या विशेष भागात सचिन खेडेकर, मांजरेकर आणि साटम यांच्या मैत्रीचे किस्से ऐकायला मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण होणार करोडपती’च्या या विषेश भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी खेळणार आहेत. हेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेत, तर कॅन्सर पेशंट्सना कोणत्याही प्रकारे जी काही मदत करता येईल, त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेणार, असे त्यांनी सांगितले.

सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या गप्पा रंगल्या. शिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक संगीत वरदान वेळसचा किस्सा सांगितला आहे. पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण त्यांनी सांगितली. तर महेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्या ऑडिशनची आठवण सांगितली. या तिन्ही जिवलग मित्रांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हा विशेष भाग १७ जून, शनिवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.