‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘रंग माझा वेगळा’, ‘अजूनही बरसात आहे’ अशा विविध गाजलेल्या मालिकांमधून अभिनेता निखिल राजेशिर्के घराघरांत लोकप्रिय झाला. छोट्या पडद्यावर चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केल्यावर आता अभिनेत्याने एक नवी इनिंग सुरू केली आहे. वैयक्तिक आयुष्यात निखिलने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा उरकला आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदेने त्याच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत अभिनेत्याला पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवानी सोनार, अभिषेक गावकर अशा काही मराठी कलाकारांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एका नव्या आयुष्याची सुरुवात करत साखरपुडा केल्याचं समोर आलं आहे. यांच्यासह छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरांत अधिराज्य गाजवणारा अभिनेता निखिल राजेशिर्केचा साखरपुडा देखील थाटामाटात पार पडला आहे.

selena gomez engaged
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”

हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे पहिली भेट ते लग्न! ‘अशी’ आहे योगिता-सौरभची लव्हस्टोरी, पहिलं कोणी केलं प्रपोज?

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील त्याची सहकलाकार व आघाडीची अभिनेत्री रेश्मा शिंदेने फोटो शेअर करत निखिलला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याचा व त्याच्या होणाऱ्या पत्नीचा फोटो शेअर करत रेश्माने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘अभिनंदन’ असं लिहिलं आहे.

हेही वाचा : Video : सई ताम्हणकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी! लेकीचा आनंद पाहून आई भारावली

दरम्यान, निखिल ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने नेहा अर्थात प्रार्थना बेहेरेच्या ऑनस्क्रीन पहिल्या पतीची भूमिका साकारली होती. सध्या मराठी कलाविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader