‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका. अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०२१ला सुरू झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेने अडीच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील यश (श्रेयस तळपदे) व नेहा (प्रार्थना बेहेरे) ही जोडी जितकी लोकप्रिय झाली तितकीच लोकप्रिय यश व समीरची (संकर्षण कऱ्हाडे) मैत्रीण झाली. यश व समीरची मैत्री खऱ्या आयुष्यातही तितकीच छान आहे. मालिका संपून वर्ष झालं असलं तरी अजूनही दोघं कायम सोशल मीडियावर एकत्र असलेले फोटो शेअर करत असतात. नुकत्याच दोघांच्या एका फोटोमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ २’च्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील’ यश म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे व समीर म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची नुकतीच भेट झाली. या खास भेटीचा फोटो संकर्षणने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच फोटोमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला असून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाच्या चर्चांना उधाण आलं आहे. “खूप दिवसांनंतर ही जोडी बघायला खूप छान वाटलं”, “भाऊ-भाऊ दिसत आहात”, “ही जोडी तुटायची नाही”, “जय-वीरू”, “माझी तुझी रेशीमगाठ २ येतेय का?”, “माझी तुझी रेशीमगाठ २मध्ये तुमची मैत्री परत बघायला आवडेल”, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया श्रेयस व संकर्षणला पाहून उमटल्या आहेत.

Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव

हेही वाचा – Video: ‘पारू’ मालिकेतील आदित्यने खऱ्या बायकोसाठी केला खास पदार्थ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझा सॉलिड शेफ”

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने श्रेयसबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “श्रेयस संकर्षण = यश समीर…काल खूप दिवसांनी भेटलो..खूप गप्पा मारल्या..खूप हसलो…फार फार मज्जा आली…या गप्पा तुम्हालाही पाहायला, ऐकायला आवडतील का? कुठे कसं ते श्रेयस तळपदे सांगतील.”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये गुरू रंधावाच्या गाण्यावर रणवीर सिंहने ओरीला उचलून घेतलं अन्…, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये कॅटी पेरीचा रॉकिंग परफॉर्मन्स, अंबानींच्या पाहुण्यांना थिरकायला पाडलं भाग

संकर्षणच्या या कॅप्शनवरून ‘माझी तुझी रेशीमगाठ २’ मालिकेसाठी ही भेट झाली नसून संकर्षणने श्रेयसची घेतलेली एखादी मुलाखत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या भेटीमागचं नेमकं कारण ‘माझी तुझी रेशीमगाठ २’ आहे की मुलाखत हे श्रेयसच्या खुलासानंतर समोर येईल.

Story img Loader