‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. अभिनेते तुषार दळवी, हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर, दिव्या पुगावकर असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत या नव्या मालिकेचे दोन दमदार प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळेच ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. या नव्या मालिकेत ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये झळकलेली अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अभिनीत ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तसंच मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय ठरलं. मग ते सकारात्मक पात्र असो किंवा नकारात्मक पात्र असो. प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. असंच एक लोकप्रिय ठरलेलं पात्र म्हणजे मीनाक्षी वहिनी. अभिनेत्री स्वाती देवल हिनं हे पात्र उत्तमरित्या निभावलं होतं. आता हीच मीनाक्षी म्हणजेच स्वाती देवल पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजू अडकला लग्नबंधनात, किंशुक वैद्यचं मराठी रितीरिवाजानुसार झालं लग्न; फोटो आले समोर

‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील नव्या प्रोमोमध्ये स्वाती देवल झळकली आहे. हाच प्रोमो शेअर करत स्वातीने लिहिलं आहे, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमधल्या मीनाक्षीनंतर एक अतिशय भन्नाट अशी भूमिका घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘झी मराठी’वर ‘लक्ष्मी निवास’ या बहुचर्चित अशा मालिकेतून पुनरागमन करत आहे…आणि हो सगळ्यात महत्वाचं…मधे अनेक मालिका केल्या…’कळत नकळत’ असो, ‘वादळवाट’ असो, ‘कुंकू’ असो, ‘एका पेक्षा एक’ असो, ‘उंच माझा झोका असो’ किंवा ‘फूबाईफू’ असो, ‘चला हवा येऊ द्या’चे काही भाग असो अशा अनेक काल्पनिक, नॉन फिक्शन मालिकांतून मी आजवर काम केलं, जे तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी उचलून धरलं..आता तुम्ही माझ्या या ही भूमिकेला प्रेम द्याल अशी खात्री बाळगून लवकरच आमच्या मालिकेची तारीख घोषित करेन.”

“सर्वात अजून एक जुळून आलेली गोष्ट म्हणजे…२००७/२००८ साली ‘कळत नकळत’ या मालिकेतून माझी आणि हर्षदा ताईची सासू सुनेची जोडी भन्नाट गाजली…आता पुन्हा एकदा तब्बल १७ वर्षांनी थोडा नात्यात बदल करून ‘झी’शी नाळ जोडत तुम्हाला भेटेन…तुमचे असेच आशीर्वाद पाठीशी ठेवा…आणि हमखास प्रतिक्रिया द्या…तुम्हाला माहिती आहेच. मी माझ्या प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधत असते…भेटूच तुमच्या प्रतिक्रिया मी नक्कीच इन्स्टाग्रामवर शेअर करेन. ‘लक्ष्मी निवास’ ही एक गाजलेली कन्नड मालिका आहे. ज्याचा हा रिमेक असला तरी पात्र आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत…भेटू प्रेक्षक हो…प्रचंड प्रेम…खूप खूप आभार,” असं स्वातीने लिहिलं आहे.

हेही वाचा – “अथक मेहनत करून…”, सहा महिन्यांत बंद होणाऱ्या ‘अबीर गुलाल’ मालिकेतील अभिनेत्रीचं पत्र; म्हणाली, “हाय अंबाबाईची साथ, तर…”

हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरच्या गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेनेच्या लावणीचा ठसका; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “कडक…”

दरम्यान, अलीकडेच स्वाती देवल ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुख कळले’ मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत स्वातीने वृंदाची भूमिका साकारली होती. स्वातीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majhi tujhi reshimgath fame swati deval play new role in laxmi niwas serial pps