अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अभिनीत ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तसेच मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय ठरलं. मग ते सकारात्मक पात्र असो किंवा नकारात्मक पात्र असो. प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. असंच एक लोकप्रिय ठरलेलं पात्र म्हणजे मीनाक्षी वहिनी. अभिनेत्री स्वाती देवल हिनं हे पात्र उत्तमरित्या निभावलं होतं. आता या मालिकेनंतर स्वाती नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत तिनं स्वतः जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “तुला स्टेजवर येऊन मारीन” असं उपेंद्र लिमये प्रवीण तरडेंना का म्हणाले होते? वाचा…

अभिनेत्री स्वाती देवल हिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये तिनं आपण नव्या भूमिकेत पुन्हा दिसणार असल्याचं सांगितलं आहे. स्वाती म्हणाली की, “नमस्कार प्रेक्षकहो, आता मी लवकरात लवकर तुमच्या समोर येतेय. याबाबत सोशल मीडियावर मी नुसती एक पोस्ट शेअर केली, तर मला तुमच्यासारख्या प्रेक्षकांचे असंख्य संख्येने मेसेज आले. त्यामध्ये प्रेम होतं, आशीर्वाद होते. काही जणांचे तर पत्रासारखे मेसेज आलेत, ते मी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतेय आणि हेच करत असताना मला असं लक्षात आलं की, तुम्ही एमटीआर (माझी तुझी रेशीमगाठ)मधल्या वहिनीवर खूप प्रेम करत होता आणि पर्यायाने ते प्रेम मला ही मिळतं होतं. असंच तुम्हाला माझ्या नवीन भूमिकेवर प्रेम करायचं आहे.”

पुढे स्वाती म्हणाली की, “तुमची जास्त उत्सुकता न ताणता तुमच्याबरोबर माझी नवीन सुरुवात शेअर करतेय. ‘सोनी मराठी’वर रात्री आठ वाजता ‘राणी मी होणार’ ही मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होतं आहे; तर या मालिकेतून नवीन रूपात आणि नवीन रंगात मी तुमच्या समोर येत आहे. जसं तुम्ही माझ्या एमटीआर मालिकेतील वहिनीवर प्रेम केलं, तसंच तुम्ही याही भूमिकेवर प्रेम करणार आहात. मला जास्तीत जास्त संख्येने मेसेज करणार आहात आणि खूप संख्येने माझ्यावर प्रेम करणार आहात, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”

हेही वाचा – ‘हा’ अभिनेता साकारणार होता आनंद दिघेंची भूमिका, पण…; दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा

हेही वाचा – “… तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता”; दिग्दर्शक प्रवीण तरडे खंत व्यक्त करीत म्हणाले…

दरम्यान, स्वाती देवल ही प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल याची पत्नी आहे. तुषार देवल हा कित्येक वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majhi tujhi reshimgath fame swati deval play new role in rani mi honar sony marathi serial pps
First published on: 08-08-2023 at 11:18 IST