झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांना विशेष पसंती मिळत आहे. त्याबरोबरच संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर, मायरा या कलाकारांमुळे त्याला चार चांद लागले आहेत. नुकताच पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला सर्वाधिक पुरस्कार मिळाले. यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष या विभागात अभिनेते आनंद काळे यांना पुरस्कार मिळाला आहे. ते माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील विश्वजित काका हे पात्र साकारत आहेत.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत विश्वजित चौधरी हे पात्र आनंद काळे यांनी साकारले आहे. या पात्रामुळे घराघरात त्यांना ओळख मिळाली आहे. ते सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष यात पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी पुरस्कार स्विकारताना व्हिडीओही शेअर केला आहे. त्याला त्यांनी कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “यांना कामधंदे नाहीत का?” अंथरुणाला खिळून असलेल्या वृत्तांवर वर्षा दांदळेंनी व्यक्त केला संताप
आनंद काळे यांची पोस्ट
धन्यवाद झी मराठी…. आज पर्यंत “झी मराठी” नी खरंच खूप वेगवेगळे रोल करायची संधी दिली.. जाडूबाई जोरात असेल किंवा स्वराज्य रक्षक संभाजी मधील कोंडाजी बाबा फर्झद असेल किंवा आत्ताचा माझी तुझी रेशीमगाठ मधील विश्वजीत असेल.. या अशा काही रोल मुळे माझी अभिनय क्षेत्रातील वाटचाल समृद्ध होण्यासाठी खूप मोठा हातभार लागला आहे.. अत्यंत टोकाचे रोल करायला दिल्या बद्दल झी मराठीचे खूप खूप आभार..
मायबाप.. रसिक प्रेक्षक हो.. तुम्ही दिलेल्या, देत असलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे…असेच प्रेम आणि आशीर्वाद असूद्या… या प्रेमामुळेच नवनवीन आव्हाने स्वीकारण्याच बळ मिळतं… पुन्हा एकदा सगळ्याचे आभार… स्वामींची कृपा… , असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली
आनंद काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्य तसेच चित्रपट, मालिका सृष्टीत कार्यरत आहेत. ते मूळचे कोल्हापूरचे असलेल्या आनंद यांनी आपले शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. आनंद काळे हे हॉटेल व्यावसायिक आहेत हे बऱ्याच जणांना माहीत आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध हॉटेल कार्निव्हल आणि राजपुरुष यांचे ते मालक आहेत. आनंद यांना स्पोर्ट्स बाईक्सची अत्यंत आवड आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच आनंद यांनी बायकिंग आणि रेसिंगमध्येही सहभाग दर्शवला होता. त्यांचे लक्झरी बाईक आणि लक्झरी कार प्रेम त्यांच्या मित्रपरिवाराला चांगलेच परिचयाचे आहे.