झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सध्या चर्चेत आहे. प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्येही सरस आहे. प्रार्थना-श्रेयसच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला तर प्रेक्षक अधिक पसंती देताना दिसतात. प्रार्थनाने नेहा तर श्रेयसने यश हे पात्र या मालिकेमध्ये साकारलं आहे. मध्यंतरी यश-नेहाच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचं मालिकेमध्ये पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा हे दोघं एकत्र आले आहेत.

मालिकेमधील ऑनस्क्रिन कपलचे रोमँटिक सीन्स चर्चेचा विषय ठरतात. आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्येही यश-नेहामध्ये रोमान्स पाहायला मिळणार आहे. दोघांमध्ये आता जवळीक निर्माण झाली आहे. आता यश-नेहामधील रोमँटिक सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याचाच एक व्हिडीओ प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये श्रेयससह ती “और क्या” या सुपरहिट हिंदी गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकरने तिचा या रोमँटिक व्हिडीओ पाहून कमेंट केली आहे.

आणखी वाचा – “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या” म्हणणारा शिव ठाकरे आधी करायचा पानटपरीवर काम, वर्तमानपत्रंही विकायचा अन्…

आपल्या पत्नीचा हा सुंदर व्हिडीओ पाहून अभिषेकने तिला कमेंटच्या माध्यमातून “आय लव्ह यू” असं म्हटलं आहे. तसेच प्रार्थनानेही त्याला प्रतिसाद देत “आय लव्ह यू टू” म्हणत नवऱ्यावर प्रेम व्यक्त केलं. सध्यातरी यश-नेहाचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस पडत आहे.

Story img Loader