झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांसारख्या कलाकारांची या मालिकेमध्ये मुख्य भूमिका होती. सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मालिकांच्या यादीमध्ये ‘माझी तुझी रेशीमगाठ’चाही समावेश झाला. या मालिकेमुळे एका बालकलाकाराची अधिक चर्चा रंगली. ती म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ. मायराला या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.
मायराची या मालिकेमधील भूमिका कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरली. मायराचे सोशल मीडियावरही हजारो फॉलोवर्स आहेत. आता मायराने एक नवी भरारी घेतली आहे. ती लवकरच एका हिंदी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही कारण…; अभिनेत्रीचा बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाली, “मला…”
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/prarthana.jpg?w=830)
‘हिंदी कलर्स’ वाहिनीवर मायराची नवी मालिका येत आहे. या मालिकेचा प्रोमो आता समोर आला आहे. ‘नीरजा एक नई पहचान’ असं या मालिकेचं नाव आहे. मायरा या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये असल्याचं दिसून येत आहे. तसेच प्रोमोमध्ये तिचा निरागस आणि हसरा चेहरा लक्ष वेधून घेणारा आहे. “मायराच्या नव्या मालिकेबाबत घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे” असं व्हिडीओ शेअर करताना मायराच्या टीमने म्हटलं आहे.
मायराची नवी मालिका
मायराच्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते तिचं अभिनंदन करत आहेत. तसेच तिच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. शिवाय प्रार्थना बेहरेने हा व्हिडीओ पाहून केलेली कमेंट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. मायराच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रार्थना म्हणाली, “माझं बाळ तुझं खूप खूप अभिनंदन. मला तुझा खूप अभिमान आहे”. मायरासह अभिनेत्री स्नेहा वाघ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल.