‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रेवती हे पात्र साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्वेता मेहेंदळे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट्स देत असते. श्वेताचा पती राहुल मेहेंदळेदेखील लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. श्वेता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका करत असताना तिच्या राहुलला ब्रेन स्ट्रोक आला होता. तिने एका मुलाखतीत अलीकडेच तिच्या आयुष्यातील या आव्हानात्मक आणि भावनिक काळाबद्दल भाष्य केलं.

अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “अशा उत्पादनांचं जाहीरपणे…”

Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

श्वेता म्हणाली, “मी शोचे शूटिंग करत होते आणि अचानक माझ्या वडिलांचा फोन आला की त्यांनी राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मी सेटवर कोणाला काही सांगितले नाही. मी तिथून निघाले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यावर राहुलला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे मला कळाले. त्याला बोलताही येत नव्हते. तो परत अभिनय करू शकेल की नाही याची मला काळजी वाटत होती. या कठीण काळात राहुलच्या कुटुंबीयांनी आणि भावांनी आम्हाला मदत केली. तो बरा झाला आणि आता पुन्हा शोमध्ये काम करतोय, हे बघून मी खूप आनंदी आहे.”

दरम्यान, श्वेता व राहुल दोघेही मराठी इंडस्ट्रीत सक्रिय असलेले जोडपे आहे. ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेत श्वेता आणि राहुलने एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवरच श्वेता आणि राहुलच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले, नंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव आर्य आहे.

Story img Loader